सोनखेड, दि. 26 सप्टेंबर 2026 : लोकमान्य महाविद्यालय, सोनखेड येथे विद्यार्थ्यांसाठी ‘बँकिंगच्या तयारीसाठी करिअर मार्गदर्शन’ या विषयावर विशेष मार्गदर्शन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.आनेराव एम.एम. यांनी भूषविले. कार्यक्रमाचे आयोजन समन्वयक डॉ. सूर्यकांत पवार व डॉ. एस. के. शिंदे यांनी केले.
यावेळी iB&M Education चे Guest Faculty सचिन इसादकर व प्रतीक पापंटवार यांनी विद्यार्थ्यांना बँकिंग क्षेत्रातील विविध करिअरच्या संधी, स्पर्धा परीक्षांची तयारी, परीक्षेची पद्धत, अभ्यासाचे नियोजन तसेच यशस्वी होण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन केले. CAT, MBA CET, MCA CET, IBPS, SBI, RRB, LIC आदी परीक्षांविषयीही विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती देण्यात आली.
बँकिंग क्षेत्रात करिअर घडविण्यासाठी योग्य दिशा, सातत्यपूर्ण अभ्यास आणि नियोजन आवश्यक असल्याचे मार्गदर्शकांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिंदी विभागप्रमुख डॉ. एस. के. शिंदे यांनी केले, तर आभार क्रीडा संचालक डॉ. किरण येरावार यांनी मानले.
कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या करिअर विकासासाठी अशा मार्गदर्शनपर उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याचे उपप्राचार्य डाॅ.आनेराव एम.एम.यांच्या वतीने सांगण्यात आले.

