लोकमान्य महाविद्यालयात करिअर मार्गदर्शन मेळाव्यास प्रतिसाद

सोनखेड : येथील लोकमान्य महाविद्यालय व मातोश्री प्रतिष्ठान यांच्या वतीने ४ फेब्रुवारी रोजी करिअर मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

सदरिल मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. आर. आगलावे हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. सदानंद शिंदे, प्रा. योगेश सरपटे व प्रा. संजय गहुंमार हे उपस्थित होते. प्रा. सदानंद शिंदे विद्यार्थ्यांनी जीवनात नियोजन करणे फार महत्त्वाचे असते तरच यशस्वी होतो, असे प्रतिपादन केले. एम. बी. ए. हा कोर्स विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याच बरोबर त्यांनी एम. बी. ए. करण्यासाठी काय तयारी केली पाहिजे याचे सखोल मार्गदर्शन केले.

यानंतर प्रा. संजय गहुंमार यांनीही मार्गदर्शन केले. मंचावर प्रमुख पाहुण्यांसोबत महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अनेराव, डॉ. राजपाल चिखलीकर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. डॉ. के. सी. केंद्रे, प्रा. डी. आर. कांबळे, प्रा. पी. के. मोरे, प्रा. डॉ. सौ. छाया तोटावाड, प्रा. डॉ. ए. जी. धुमाळ, एस. एम. वानखेडे, बी. जी. मोरे, प्रकाश राठोड, उल्हास राठोड यांनी सहकार्य केले.

सूत्रसंचालन प्रा. डॉ. सूर्यकांत शिंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. डी. आर. गवरे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *