
लोकमान्य महाविद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी
लोकमान्य महाविद्यालय सोनखेड येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
प्रथम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हनुमंत आगलावे यांच्या हस्ते स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या विचारांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर आपले विचार व्यक्त करताना प्राचार्य डॉ. हनुमंत आगलावे म्हणाले, “राजमाता जिजाऊ या छत्रपती शिवाजी महाराजांच्या माता आणि हिंदवी स्वराज्याच्या संस्थापक होत्या. त्यांनी शिवाजी महाराजांना स्वराज्याची प्रेरणा दिली आणि एक आदर्श राजा म्हणून घडवले. त्या एक दूरदृष्टीच्या केणकर आणि कुशल प्रशासक होत्या.
स्वामी विवेकानंद हे त्यांच्या समकालीन भारतातील सर्वांत प्रभावशाली तत्त्वज्ञ आणि समाजसुधारकांपैकी एक होते. त्यांचा जन्मदिवस भारतात ‘राष्ट्रीय युवा दिन’ म्हणून साजरा केला जातो.”
सूत्रसंचालन क्रीडा विभाग प्रमुख प्रा. डॉ. किरण येरावर यांनी केले तर आभार प्रा. डॉ. आशा धुमाळ यांनी मानले.

